shabarikumbh

Menu:

Invitation:

11-13 Feb'06:
All are invited for this religious gathering in Dang, Gujrat.

- Marathi

- Hindi

More info:

The success of this event depends on the active co-operation of all Hindus All donation are exempt under section 80 G of Income Tax Act. Cheques may be drawn in the name of Shri Shabri Kumbh Samaroh Aayojan Samiti.

Links:

- RSS
- VHP - VKP


।।राम राम।।

हार्दिक निमंत्रण

श्री शबरीकुंभ - 2006

माघ पौर्णिमा विक्रम सं. 2062, 11,12,13 फेब्रुवारी, 2006
कुंभस्थान : पंपा सरोवर, सुबीर, जि. डांग, गूजराथ.
श्री शबरीधाम
कुंभ कार्यालय
श्री. शबरीकुंभ समारोह समिती
1, जीवन विकास सोसायटी, आदर्श सोसा. के पास, अठवालाइन्स, सूरत - 395 001. गूजराथ.
दूरभाष : 0261-2664074

श्री शबरीकुंभ - 2006

पितृआज्ञा पाळण्यासाठी रामवनवासात गेले होते. वनवासानिमित्त दंडकारण्यातील पंचवटीत निवास असताना रावणाने सितेचे अपहरण केले. सीतेच्या शोधात निघालेले श्रीराम लक्ष्मण एक दिवस शबरीच्या झोपडीत पोहचले. वर्षानुवर्ष रामाची आतुरतेने वाट पाहणा-या शबरीच्या घरी जणू काही सोन्याचा दिवस उगवला. माता शबरीने प्रभू रामचंद्राच्या चरणावर प्रेमाश्रुने अभिषेक केला.प्रभु रामचंद्राच्या येण्याने व माता शबरीच्या भक्तीरसाने हि धरा धन्य झाली.
    गोस्वामी तुलसिदासांनी रामचरितमानसाच्या अरण्यकांडामधे या प्रसंगाचे वर्णन करताना म्हटले आहे की.....
ताहि देइ गति राम उदारा। शबरी के आश्रम पगु धारा।
शबरी देखि राम गृह आए। मुनि के बचन समुझि जियँ भाए।।
    या पवित्र स्थानी म्हणजे 'शबरीधाम' येथे निर्माण केलेल्या भव्य मंदिरात, शरदपौर्णिमा 2004ला, प्रभूराम लक्ष्मण व माता शबरी यांच्या मूर्तिच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा संपन्न झाला.शरदपोर्णिमेला शबरी मातेचा जन्म झाला. या दिवशी दरवर्षी शबरीधाम येथे यात्रा भरते. वसंतपंचमीच्या (माघ शु. 5) या शुभ दिनी प्रभु राम चंद्राचे या ठिकाणी आगमन झाले होते.याच दिवसात राम-लक्ष्मण आगमन यात्रा  गावोगाव फिरुन अत्यंत उत्साहात शबरीधाम येथे पोहोचते.  याचठिकाणी हजारो वर्षानंतर सन 2002 साली वनवासी बंधूनी पू. मूरारी बापूनी सांगितलेल्या रामकथेचे अमृतपान केले.
कथेच्या दरम्यान पू. मुरारीबापूनी शबरीकुंभाच्या योजनेविषयी सहज उद्गार काढले. पू. संताची वाणी ही आज्ञा समजून ते आवाहन सर्वानी स्वीकारले.स्थानिक वनवासीनी या कुंभाला भव्य रुप देण्याच्या दिव्य संकल्प केला.  कुंभमेळा ही हिन्दु समाजाची सांस्कृतिक परंपरा आहे. या निमित्ताने समाज एकत्रित येत असतो, व पूज्य साधु-संताचे विविध विषयावरील मार्गदर्शन ग्रहण करत असतो. ज्या प्रकारे शरीरातील सर्व धमन्यातून अशुध्द रक्त ह्रदयाकडे येवून पुन्हा शुध्द होते. व शरीरामधे चैतन्य निर्माण करते.
त्याचप्रमाणे शबरीकुंभामध्ये मोठ्या संखेने समाज सहभागी होणार असून धर्मजागरण व धर्मरक्षेचा संदेश घेवून राष्ट्रचेतना जागृत करेल.
    शबरीमातेचे गुरु मातंग ऋषि, व अन्य ऋषिगण ज्या पंपासरोवरामधे स्नान करत असत. त्या सरोवराच्या किनाऱ्यावर माघ पौर्णिमा, विक्रमसंवत 2062 (11,12,13 फेब्रुवारी 2006) ला श्री शबरीकुंभ संम्पन्न होणार आहे.  रावणासारख्या राक्षसी शक्तीचा प्रभु रामचंद्राने संहार केला. सध्याच्या काळात सुध्दा आपल्या समाजात फूट पाडणाऱ्या व समाज तोडणाऱ्या राक्षसी व मायावी शक्तीना ओळखून, त्यांचा निपा:त करण्याचे आव्हान श्री शबरीकुंभाच्या निमित्ताने सर्वांसमोर आहे.

शबरीधाम परिसराचा थोडासा परिचय

डांग अर्थात दंडकारण्य
भारताच्या पश्चिमेला आणि गुजराथ महाराष्ट्राच्या दक्षिण-उत्तर सीमेवर गुजराथचा डांग जिल्हा  आहे. गुजराथच्या वलसाड, नवसारी, सुरत व महाराष्ट्राच्या नाशिक, नंदुरबार, धुळे इ. जिल्हयांचा मिळून जो डोंगराळ प्रदेश आहे तो अत्यंत नयनरम्य व सदाहरित असतो. निसर्गाने या प्रदेशाला भरभरून दान दिले आहे.
    डांग व त्याच्या आजूबाजूच्या क्षेत्राला दंडकारण्य म्हणून ओळखले जाते. वाल्मीकी रामायणात अरण्यकांडामधे पंचवटीच्या नेऋत्येला दंडकारण्याचा उल्लेख आहे.
    डांगचे जिल्हा केंद्र आहवा येथे दंडकेश्वर महादेव जणू याचीच प्रचीती देत असतात. डांग ही एक धर्मभूमी आहे. डांग परिसरातीत विविध धार्मिक स्थानावर लाखो श्रध्दाळू भक्त विविध प्रसंगी एकत्र जमतात.
    डांग जिल्ह्याचा सांस्कृतिक व ऐतिहासिक परिचय रामायण काळापर्यंत जातो. जिल्ह्यामधील अनेक तीर्थस्थळे याची साक्षीदार आहेत. त्यातील काहींचा परिचय प्रवासात आणखीन आनंद वाढवू शकतो.
शबरीधाम :- आहवा या मुख्य शहरापासून 35 कि. मी. अंतरावर सुबीर गावाजवळ हे तीर्थस्थळ आहे. 'चमक' डोंगर' या नावाने प्रसिध्द असलेल्या या टेकडीवर प्रभुराम-लक्ष्मण व शबरी यांची भेट झाली होती. अशी इथली आख्यायिका आहे. ज्या दोन शीलांवर राम-लक्ष्मण बसले होते त्या शिला आजही पहावयास मिळतात.वर्षानुवर्षे स्थानिक वनवासी हिंदु समाज, या शीलांचे अत्यंत भक्तियुक्त अंत:करणाने पूजन करतो. वाल्मिकी रामायणातील उल्लेखानुसार, प्रभुरामचंद्राच्या दर्शनानंतर शबरीमातेने योगाग्निने आपल्या जीवनाची सांगता केली. या योगाग्निच्या प्रकाशाने हा पर्वत व सारा परिसर उजळून निघाला. कदाचित यामुळेच या डोंगराला 'चमक डोंगर' या नावाने सर्व जण ओळखत असावेत असे वाटते.
    शबरीधाम हे एक पवित्र स्थान आहे. जिथे वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रम सुरुच असतात. या कार्यक्रमाद्वारे सतत समाज जागृति होत असते. दरवर्षी शरदपौर्णिमेला इथे यात्रा भरते. कुंभपर्वाच्या निमित्ते शबरीधामचा विकास सुरु आहे.
पंपा सरोवर :- शबरीधामपासून 6 कि. मी. दूर असणारे हे स्थान म्हणजेच श्री शबरीकुंभाचे स्थान होय. रामायणामधे पंपा सरोवर पुष्करिणी नदीच्या किनाऱ्यावर आहे. असा उल्लेख येतो. इथे पूर्णा नदीचा प्रवाह आहे. कदाचित हिलाच प्राचीन काळात 'पुष्करिणी' नावाने ओळखले जात असावे, असे वाटते. तसेच पंपा सरोवराच्या किनाऱ्यावर असंख्य सुगंधित पुष्प आहेत.
रामायणामधेही करंज पुष्पांचे वर्णन आहे. पंपा सरोवराजवळील 'करंजडा' गावाचे नाव कदाचित या करंज पुष्पामुळेच पडले असावे. शबरीमातेचे गुरु मातंग ऋषिंचा आश्रमही जिथे होता असा 'मातंग पर्वत' पंपा सरोवराच्या जवळच आहे.
उनाई :- संपूर्ण भारतामध्ये 'घरवापसी' चा संदेश देणारे स्थान वनवासी समाजाच्या श्रध्देचे केन्द्र आहे. या स्थानावर गरम पाण्याचे कुंड व उनाई मातेचे भव्य मंदिर आहे. रामायण काळामधे शरभंग ऋषिंना कुष्ठरोगातून मुक्त करण्यासाठी प्रभूरामांनी मंत्रशक्तीने बाण सोडून येथे गरम पाण्याचा प्रवाह सुरु केला होता. आज हि शेकडो भाविक गरम पाण्याच्या कुंडामधे स्नान करुन रोगमुक्त होतात. आहवा पासून 50 कि. मी. दूर असलेले हे स्थान श्रध्देची त्रिवेणी आहे.
अंजन कुंड :- शबरीधामपासूव 51 कि. मी. अंतरावर असलेल्या डोंगरात हे कुंड आहे. पवनपुत्र हनुमानाच्या आईच्या नावाने हे कुंड प्रसिध्द आहे. अंजनीदेवीने या कुंडामधे स्नान केले होते. आणि हनुमानाचा जन्म याच पर्वत रांगामधे झाला होता. अशी एक लोक आख्यायिका आहे.रामायणातील सुग्रीवाच्या निवास स्थानाच्या वर्णनाशी जुळणाऱ्या गुफाही या पर्वतरांगेमधे विद्यमान आहेत. पायथ्याशी पवित्र कुंड आहे. या कुंडा शेजारीच बसून
लक्ष्मणाने आपल्या बाणाला टोकदार बनवले होते. त्याच्या खुणाही इथे आहेत अशी श्रद्धा आहे. हनुमानजी सीतेच्या शोधार्थ निघाल्यावर त्यानी ज्या मार्गाने चारण जाता तोच मार्ग निवडला होता. आजही चारण समाज त्या परिसरात विखुरलेला आहे. त्यामुळे या मान्यतेला पुष्टी मिळते. अंजनकुंडा पर्यंत जाण्याचा रस्ता अजूनही कच्चा व दुर्गम आहे. परंतु एकदा तिथे पोहचले की अविस्मरणीय अनुभव येतो.